दूधगंगा धरण प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
schedule30 Jul 24 person by visibility 452 categoryलाइफस्टाइल
कोल्हापूर : दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू असून, जलाशय परिचलन सूचीप्रमाणे पाणीसाठा नियंत्रित राहण्यासाठी आणि धरण सुरक्षिततेसाठी आज दिनांक 30 जुलै 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता धरण सांडव्यावरून 7600 क्युसेक व विद्युतगृहातून 1500 क्युसेक असा एकूण 9100 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार, विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येणार आहे.
या विसर्गामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असून, नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. संभाव्य पूर परिस्थितीचा विचार करून, नागरिकांनी काळजी घ्यावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. त्याचबरोर धरण व्यवस्थापनाच्या या निर्णयामुळे पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवता येईल, असे सांगण्यात आले आहे.
या विसर्गामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असल्याने, नागरिकांनी सावधगिरी बाळगावी आणि सुरक्षित ठिकाणी हलावे, अशी सूचना देण्यात आली आहे. धरणाच्या व्यवस्थापनासाठी योग्य ती पावले उचलण्यात आली आहेत, परंतु नागरिकांनी स्वतःची सुरक्षा लक्षात घेऊन योग्य ती काळजी घ्यावी, तसेच नदीकाठच्या सर्व नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून पूरस्थितीबाबत सतर्क राहावे. असे आवाहन करण्यात आले आहे.
दूधगंगा धरण प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
schedule24 Jul 24 person by visibility 493 categoryसामाजिक
कोल्हापूर: दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून पाण्याने सरासरी पातळी गाठलेली आहे. धरणातील पाण्याचा नियमन करणे आवश्यक आहे. त्यामुळे जलाशय परिचलन सूची प्रमाणे धरणाच्या पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरण पायथा विद्युत निर्मिती केंद्र सुरु करून नदीमध्ये 1600 घनफूट प्रतिसेकंद (क्यूसेक्स) पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुढील चोवीस तासांमध्ये हे पाणी सोडले जाईल त्यामुळेनदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. या प्रशवभूमीवर नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा या प्रशवभूमीवर आहे. नदीच्या पाणी पातळीतील वाढ लक्षात घेऊन सर्वांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी व सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, अशी सूचना प्रशासनाने केली आहे.
धरण व्यवस्थापनाने दिलेल्या या सूचनेमुळे संभाव्य आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रशासन आणि स्थानिक लोकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाने वेळोवेळी अपडेट्स देऊन नागरिकांना माहिती देण्याचे आश्वासन दिले आहे.