असे काय घडले की? काल दिलेलं मंत्रिपद खासदार सोडण्याच्या तयारी
schedule10 Jun 24 person by visibility 184 categoryलोकसभा निवडणुक
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. मोदी यांच्या मंत्रिमंडळात एनडीएच्या सर्वच घटक पक्षांना स्थान देण्यात आलं आहे. फक्त अजित पवार गटाला मंत्रिपद देण्यात आलेलं नाही. भाजपने केरळमधील आपल्या एकमेव खासदारालाही मंत्रिपद दिलं आहे. मात्र हा खासदार मंत्रिपद सोडण्याच्या तयारीत आहे.
केरळमधील भाजपचे एकमेव आणि पहिले खासदार सुरेश गोपी यांनी काल केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यमंत्री म्हणून त्यांचा मोदी मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. पण गोपी हे आता मंत्रिपद सोडण्याची शक्यता आहे. एका प्रादेशिक वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी मंत्रीपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मी मंत्रिपद मागीतलं नव्हतं. मला पक्षश्रेष्ठी या पदावरून मोकळं करतील अशी आशा आहे, असं सुरेश गोपी यांनी म्हटलंय.
सुरेश गोपी यांनी मंत्रीपद सोडण्यासाठीची अनेक कारणे सांगितली आहेत. मी अनेक सिनेमे साईन केले आहेत. ते पूर्ण करायचे आहेत. तसेच त्रिशूर लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून मला काम करायचं आहे. त्यासाठी मोकळा वेळ हवा आहे, असं सुरेश गोपी यांनी स्पष्ट केलं. सुरेश गोपी हे केरळमधून निवडून आलेले भाजपचे पहिले खासदार आहे. केरळमधील भाजपचा हा पहिला विजय आहे. सुरेश गोपी हे त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांनी भाजपचा पहिला खासदार म्हणून इतिहासात स्वत:चं नाव कोरलं आहे. त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे उमेदवार व्ही. एस. सुनीलकुमार यांचा 74,686 मतांनी पराभव केलाय.