का लपवतेय आलिया आपल्या मुलीचा चेहरा?
schedule06 Nov 23 person by visibility 100 categoryमनोरंजन

मुंबई: बी-टाऊनचे पॉवरफुल कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची मुलगी राहा कपूर 6 नोव्हेंबरला एक वर्षाची झाली आहे. मात्र या जोडप्याने अद्याप तिचा चेहरा उघड केलेला नाही. आलिया अनेकदा राहासोबत स्पॉट झाली आहे. पण जेव्हा ती मीडियाला पाहते तेव्हा ती राहाचा चेहरा झाकते. त्यामुळे अभिनेत्री सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल झाली आहे. आता अलीकडेच आलियाने एका इव्हेंटमध्ये यामागचे कारण उघड केले आणि ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले.
अलीकडेच, आलिया एका चॅट शोमध्ये दिसली होती, जिथे तिला विचारण्यात आले होते की ती तिच्या मुली राहाचा चेहरा चाहत्यांना कधी दाखवणार आहे. तर आलिया म्हणते, “आम्हाला राहाचा चेहरा लपवायचा आहे असं अजिबातच नाही. "परंतु आम्हाला या तिच्या अपब्रिंगीगमध्ये सहभागी व्हायचं आहे. योग्य वेळ आल्यावर आम्ही नक्कीच राहाचा चेहरा सगळ्यांना दाखवू पण तोपर्यंत ही गोपनियता सांभाळणे आमच्यासाठीही आवश्यक आहे.