Maha Hit 24
Register

जाहिरात

 

सुवर्ण आठवणींचा साक्षीदार.....

schedule31 Aug 24 person by visibility 116 categoryमनोरंजन

कोल्हापूर: कोल्हापूरच्या सांस्कृतिक ओळखीतील एक अत्यंत महत्त्वाची वास्तू असलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची आग लागल्यामुळे, ती वास्तू आता अस्तित्वात नाही. कोल्हापूरकरांसाठी एक जिव्हाळ्याची वास्तू असलेल्या या नाट्यगृहाची नुसती आगीमध्ये हानी झाली नाही तर कोल्हापूरच्या सांस्कृतिक वारशाचा एक महत्त्वाचा भागही हरवला आहे. या नाट्यगृहात असंख्य सांस्कृतिक, नाट्य, आणि संगीताचे कार्यक्रम सादर झालेले आहेत, ज्यांच्या आठवणी अजूनही लोकांच्या मनात ताज्या आहेत.

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या आगीत जळालेल्या कलाकारांसाठी आणि तंत्रज्ञांसाठी सहाय्य देण्यासाठी एक विशेष संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. "दिन है सुहाना, आज पहली तारीख है" या शीर्षकाखाली 50 ते 80 च्या दशकातील गाजलेल्या गाण्यांचा एक भव्य कार्यक्रम रविवार, 1 सप्टेंबर, रोजी रात्री 9:00 वाजता गोविंदराव टेंबे रंग मंदिर (नवीन देवल क्लब) या ठिकाणी होणार आहे.

या कार्यक्रमात चेन्नईचे सुप्रसिद्ध गायक ज्योसुला शेखर, इंदोरहून शीफा आफताब, पुण्याहून कोमल कृष्णा (इंडियन आयडॉल, सारेगमापा फेम) आणि पुण्याचे प्रसिद्ध गायक अजय राव सहभागी होणार आहेत. तसेच अपुर्वा नानिवडेकर (सारेगमापा लिटल चॅम्प फेम) आणि कोल्हापूरचे गायक नितीन सोनटक्के आणि सूरज नाईक आपली गायन कला सादर करतील. कार्यक्रमाचे निवेदन सुप्रसिद्ध निवेदिका प्राजक्ता जोगळेकर-श्रावणे (पुणे) करणार आहेत.

कार्यक्रमासाठी आकाश साळोखे, अविनाश इनामदार (कि बोर्ड), गणेश साळोखे (लीड गिटार), उद्धव जाधव (बेस गिटार), डॉ. सचिन जगताप (बासरी), संदेश गावंदे (तबला), धीरज वाकरेकर (ढोलक, कोंगो), इंद्रजीत जोशी (अक्टोपॅड) आणि विनोद सावंत (परकशन) हे वादक सहभागी होणार आहेत. ध्वनी व्यवस्था प्रशांत होगाडे, लाईट व्यवस्था सुनिल आणि रोहन घोरपडे यांच्याकडे असणार आहे, तर रंगमंच व्यवस्था मिलिंद अष्टेकर व सागर भोसले यांच्याकडे असेल. इतर संयोजन संजय लोंढे पाहणार आहेत.

कार्यक्रमात मिळणाऱ्या निधीचा वापर आगग्रस्त नाट्यगृहाशी संबंधित कलाकारांना आणि तंत्रज्ञांना सहाय्य देण्यासाठीकरण्यात येणार आहे.

देणगी मूल्य:

VIP- AB: ₹1000

C ते H: ₹500
I ते L: ₹400
बाल्कनी: ₹300
संपर्क:
दिनेश माळी: 9850587662
सूरज नाईक: 9850585485
संजय लोंढे: 9890980321
सदर कार्यक्रमात सर्वानी सहभागी होऊन आपला योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले आहे


जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maha Hit 24.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes