Maha Hit 24
Register

जाहिरात

 

मोठी विमान दुर्घटना; 58 प्रवासी आणि चार कृ मेंबर्सचा जागीच मृत्यू

schedule10 Aug 24 person by visibility 158 categoryआंतरराष्ट्रीय


दिल्ली: साओ पाउलो राज्यात झालेल्या विमान दुर्घटनेत ५८ प्रवासी आणि चार कृ मेंबर्सचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ग्

गवारुलहोस आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणारे विमान क्रॅश झाले. विमानात 58 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर्स होते. मात्र अपघात कशामुळे झाला याबाबत माहिती समोर आलेली नाही.

ब्राझीलच्या साओ पाउलो राज्यात झालेल्या या अपघातात 58 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्सचा जागीच मृत्यू झाला आहे. Voipas Airlines चे ATR 72-500 हे विमान दक्षिणेकडील पराना राज्यातील कास्केवेल येथून साओ पाउलोच्या ग्वारुलहोस आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जात होते त्यावेळी हा अपघात झाला. हे विमान कोसळण्यापूर्वीचा व्हिडिओ समोर आला आहे.

अपघाताच्या दीड मिनिटापूर्वी या विमानात तांत्रिक बिघाड झाला होता, स्थानिक वेळेनुसार दुपारी 1:21 पर्यंत विमान 17 हजार फूट उंचीवर उडत होते. यानंतर अवघ्या 10 सेकंदात हे विमान सुमारे 250 फूट खाली आले. त्यानंतर पुढच्या आठ सेकंदात ते सुमारे 400 फूट वर गेले. पुन्हा 8 सेकंदानंतर ते 2 हजार फूट खाली आले, त्यानंतर अवघ्या एका मिनिटात ते अंदाजे 17 हजार फूट खाली जमीनीवर आदळले आणि त्यात आग लागली. या घटनेत 62 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा यांनी या दुर्घटनेनंतर मृतांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maha Hit 24.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes